सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ` प्रशासनाकडून नजरेआड
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ` प्रशासनाकडून नजरेआड 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ` प्रशासनाकडून नजरेआड

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आता प्रशासनही दुष्काळाच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, जिल्ह्यात यंदा आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना प्रशासनाने मात्र दृष्काळसदृश्‍य यादीत आठ तालुके समाविष्ठ करून उर्वरित तीन तालुके वगळले आहेत. शासनाच्या निकषानुसार ‘ट्रीगर दोन''मध्ये येणाऱ्या गावात दुष्काळ जाहीर होणार आहे. त्यानुसार आता आठच तालुक्‍यांची नावे दुष्काळाच्या यादीत समाविष्ठ होणार आहेत. बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे तीन तालुके मात्र त्यातून गायब केले आहेत.

केंद्र शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी नव्याने काही नियम आणि निकष ठरवले आहेत. वनस्पती स्थिती निर्देशांक, क्रॉप कव्हर, जमिनीतील ओलावा या माध्यमातून दुष्काळाचे निकष निश्‍चित केले आहेत. बार्शी, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती सामान्य, अक्कलकोट, मोहोळमध्ये मध्यम, तर करमाळा, माढा, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या सहा तालुक्‍यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे, अशा पद्धतीचे कागदी घोडे या संबंधीच्या अहवालात नाचवले आहेत. या आधारावर दुष्काळाच्या या स्थितीची यादी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने निश्‍चित केली आहे.

ट्रिगर दोन लागू झालेल्या तालुक्‍यातील १० गावे निवडून त्या गावांतील सत्यमापन मोबाईल ॲपच्या माध्यमातून आठ दिवसांत शासनाला देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार सगळे कामकजा सध्या सुरू आहे. वास्तविक, जिल्ह्यात सरसकट सारखीच परिस्थिती आहे. पण वास्तवातली परिस्थिती आणि कागदोपत्री अहवाल यात मात्र अंतर ठेवण्यात आले आहे. थेट शेतावरची परिस्थिती अधिकाऱ्यांनी लक्षात न घेता, पावसाच्या आकडेवारीवर, कार्यालयात बसूनच हा अहवाल तयार केल्याचे दिसून येते. पण त्याचा फटका या तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना बसणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT