Don't hinder farmers while disbursing loans:Mandhare
Don't hinder farmers while disbursing loans:Mandhare 
मुख्य बातम्या

कर्जवाटपावेळी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका : मांढरे

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत १ हजार २६७ कोटी प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७६ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत कर्जवाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, यासाठी जिल्हा बँकेने विशेष दक्षता घ्यावी’’, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी, व्यापारी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले, ‘‘ २०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६३९ कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी १५६ कोटी जास्त वाटप झाले. गेल्या १० ते १२ दिवसांत २५० ते ३०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. इगतपुरी व जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत आहे. उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करावे.’’ 

‘कर्जमुक्ती’तून ३४ टक्के कर्जवाटप

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उशिराने रक्कम मिळाली. तरीही जिल्ह्यात ३४ टक्के इतके कर्जवाटप केले. हे प्रमाण लक्षांकापर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जवाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे, अशाही सूचना मांढरे यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT