परभणीत दोडका १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत दोडका १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल 
मुख्य बातम्या

परभणीत दोडका १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३०) दोडक्याची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपयांचे दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ३५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये, कोथिंबिरीची १०० क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३००० रुपये राहिले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले.

काकडीची १२५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची (देवडांगर) ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ५० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये, शेवग्याची ५ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ९०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट १८० ते २५० रुपये रुपये दर मिळाले. 

हिरव्या मिरचीची १२५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये मिळाले.

भेंडीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यामध्ये बीट रुटची ३ क्विंटल आवक, तर दर १५०० ते २००० रुपये मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT