मजुरीवाढीच्या नव्या कराराशिवाय हाती कोयता घेऊ नका ः मेटे
मजुरीवाढीच्या नव्या कराराशिवाय हाती कोयता घेऊ नका ः मेटे 
मुख्य बातम्या

मजुरीवाढीच्या नव्या कराराशिवाय हाती कोयता घेऊ नका ः मेटे

टीम अॅग्रोवन

बीड : पूर्वी तीन वर्षांचा करार आता पाच वर्षांचा केला. तो करार रद्द करून तीन वर्षांचा करार झाल्याशिवाय हातात कोयता घेऊ नका, असे आवाहन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले. शिवसंग्रामचा ऊसतोड मजूर मेळावा शुक्रवारी (ता. २८) पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे झाला.

श्री. मेटे म्हणाले, की ऊसतोडणीसाठी यंत्राला मिळणाऱ्या प्रतिटन ४०० रुपये भाव मजुरांनाही मिळावा. तसेच मुकादमांचे कमिशन ३६ टक्के करावे. हंगामी वसतिगृहासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात १५ कोटी रुपये खर्च होतात. त्याऐवजी ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी वसतिगृह उभारावे; तसेच मजुरांचा विमा उतरावा. ऊसतोडणी मजुरांसाठी शिवसंग्रामच्या संघटनेची घोषणा करून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ. मेळाव्याला ऊसतोड मजूर व मुकादमांची मोठी उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT