Transport
Transport 
मुख्य बातम्या

शेतमालाच्या गाड्यांची अडवणूक न करण्याच्या पोलिसांना सूचना 

टीम अॅग्रोवन

पुणे: शहरातील नागरिकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी अनेक गट, शेतकरी कंपन्या शेतमालाची विक्री करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शेतमालाची टंचाई भासू नये, म्हणून शहरात व ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतमाल व इतर वाहनांची पोलिसांनी अडवणूक करू नये, अशा सूचना पुणे शहर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांना निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिल्या आहेत.  ‘अॅग्रोवन’ने रविवारी (ता.१०) पोलिसांच्या अडणुकीमुळे शेतकरी कंपन्या आणि गट शेतमाल विक्री बंद करत असल्याचे वृत्त प्रकाशितत केले होते. याची दखल निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी घेतली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनीही पोलिसांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडवणूकीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्याने जयश्री कटारे यांनी कोविड-१९ टॉप मोस्ट प्रायोरिटीचे परिपत्रक काढून सुचना दिल्या आहेत.  परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून शेतमालाच्या वाहतूकीसाठी सवलत दिली आहे. तसेच कृषी विषयक शेतमाल उत्पादन व विक्री, कृषी निविष्ठांचे वितरण, कृषी यंत्रे व अवजारांची विक्री -दुरूस्ती दुकाने, खरीप हंगामपूर्व मशागतीचे कामे, मजूर व वाहतूकदार यांच्या हालचाली, कृषी अवजारे, वाहतूक, शेतमाल काढणी पश्च्यात कामे, शेतमाल प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रे, खते व बी बियाणे खरेदी विक्री केंद्रे, शेतमजूर, कृषी निविष्ठा उद्योगातील कर्मचारी, कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व कामाकरिता शेतमजूर, कृषी निविष्ठा उद्योगातील कर्मचारी, कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची वाहने यांना सवलत देण्यात आली असल्यामुळे कृषी विभागाकडून सर्व संबधिताना देण्यात आलेले ओळखपत्र, पास ग्राह्य धरण्यात यावे. 

कृषी विभागाच्या सर्व आस्थापनाशी संबधित सर्व प्रकारच्या वाहनाना कोणत्याही प्रकारचे पासेसची मागणी न करण्याबाबबत सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना सुचना देण्यात याव्यात, असेही म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT