In  Diwali, milk is cut off
In Diwali, milk is cut off 
मुख्य बातम्या

ऐन दिवाळीत दुधात दरकपातीचं विरजण

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः आधी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नंतर अतिवृष्टीने दूध उत्पाद आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाला मागणी वाढणार असताना आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूध दरात कपातीचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार प्रतिलिटर एक ते दोन रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. 

राज्यात प्रामुख्याने सहकारी आणि खासगी संघांकडून दूध संकलन होते. शासकीय दूध संस्थेचे संकलन अगदीच जेमतेम आहे. सध्या राज्यात सर्वाधिक गाईचं रोज सुमारे दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ७० लाख लिटर दुधावर प्रक्रिया होते. तर ३० लाख लिटर दुधाची पावडर होते. तर उर्वरित साधारण एक कोटी लिटर दुधाची विक्री पिशवीतून होते. गेल्या दोन-अडीच वर्षापासून दूध उत्पादक वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आहेत. 

शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर देणे बंधनकारक आहे. पण खासगी आणि सहकारी दूध संघांकडून सरसकट या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसते. वास्तविक दिवाळीत दुधाला मागणी असते. शिवाय दूधही पुरेशाप्रमाणात पुरवठा होते आहे. पण तरीही दूध संघांकडून दूधदरात जाणीवपूर्वक कपात केली जात आहे. तसेच अनेक दूध संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटतात, पण अनेक संस्थांनीही लाभांशालाच थेट कात्री लावली आहे.   

कॉर्पोरेट कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळात केवळ २० रुपये प्रति लिटरने दूध घेऊन मोठ्या प्रमाणात पावडर बनविली. आज ही दूध पावडर ते चढ्या भावाने बाजारात विकून नफा कमवत आहेत. शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर किमान प्रति लिटर ५ रुपये लाभांश मिळावा. - डाॕ. अजित नवले,  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT