चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला 
मुख्य बातम्या

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

टीम अॅग्रोवन

सांगली  ः चांदोली धरणक्षेत्रात सलग पाचव्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असून धरणात २९.२९ टीएमसी पाणीसाठा झाला असून मंगळवारी (ता. १७) सकाळी आठ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळपासून धरणातून १३ हजार ८८५ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

वारणा धरण क्षेत्रातून १४ हजार क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक धरणात होत आहे. धरण क्षेत्रात सलग पाचव्यादिवशी अतिवृष्टी झाली आहे. शिराळा तालुक्‍यात ५९ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. धरणाचे चार दरवाजे सव्वादोन मीटरने उचलल्यामुळे धरणातून सकाळपासून सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे १३ हजार ८८५ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद केला आहे. आरळा-शित्तूर, कोकरूड-रेठरे बंधारा आणि मांगले-काखे पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाहूवाडी ते शिराळा तालुक्‍यातील वाहतूक विस्कळित झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT