जिल्ह्यात दोन लाख क्विंटल कांदा आवक
जिल्ह्यात दोन लाख क्विंटल कांदा आवक 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात दोन लाख क्विंटल कांदा आवक

टीम अॅग्रोवन

नाशिक : कांद्याचे निर्यातमूल्य पाचवरून दहा टक्के करण्यात आले. देशांतर्गत बाजारपेठेत कांदा पाठवण्यासाठी रेल्वेच्या दिवसाला दोन ते तीन रॅक उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जिल्हाभरात दिवसाला दोन लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. त्यातच गुजरातमधील नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे.

राजस्थान, कर्नाटकमधील कांद्याची आवक कमी झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढेल आणि भावात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. काही दिवसांमध्ये क्विंटलला ५५० रुपयांहून कमी घसरण झालेल्या नवीन कांद्याचा भाव ८५० रुपयांपर्यंत पोचला होता. मात्र दोन दिवसांपासून भावातील घसरणीला सुरवात झाली. क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी भाव घसरले. जिल्ह्यातील बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यामध्ये ५० हजार क्विंटलपर्यंत उन्हाळ, तर उरलेला दीड लाख क्विंटल कांदा नवीन आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये ७०० रुपये क्विंटल भावाने विकला जाणाऱ्या कांद्याला गुरूवारी (ता.३) ६६२ रुपये मिळाले. मुंबईत ८५० वरून ८०० रुपयांवर घसरण झाली. पण त्याचवेळी अजमेरमध्ये ७५० वरून क्विंटलभर कांद्याचा भाव एक हजार १०० रुपयांपर्यंत पोचला. चेन्नईमध्ये एक हजार ४००, पाटणात एक हजार ५०, आग्रामध्ये ८६०, इंदूरमध्ये ६००, वाराणसीमध्ये एक हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यातून देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांदा पाठवला जात आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसामचा समावेश आहे. याशिवाय कोलंबो, दुबईला निर्यातीसाठी कांदा पाठवला जात आहे. निर्यातीसाठी पाठविण्यात येणाऱ्या कांद्याचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपर्यंत असून, ७५ टक्के कांदा देशांतर्गत रवाना होत आहे.

कांद्याचे गुरूवारचे भाव (क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

देवळा ६५०
कळवण ४०१
लासलगाव ६१५
चांदवड ६००
मनमाड ५५०
पिंपळगाव ६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT