Distribution of Rabbi Peak Loan by Pune District Bank
Distribution of Rabbi Peak Loan by Pune District Bank 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज वाटप सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. रब्बी हंगामास सुरुवात झाली असून बँकेकडून कर्ज वाटप सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

यंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भेर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

तालुकानिहाय पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
तालुका उद्दिष्ट
आंबेगाव ६१ कोटी ३४ लाख १० हजार रुपये
बारामती ४० कोटी ७ लाख ७१ हजार
भोर १७ कोटी ३५ लाख ३८ हजार
दौंड ५५ कोटी ८७ लाख २ हजार
हवेली १५ कोटी ४ लाख ७२ हजार
इंदापूर ८५ कोटी ६६ लाख ५५ हजार
जुन्नर ७० कोटी ४६ लाख ६९ हजार
खेड ६२ कोटी ६८ लाख ५० हजार
मावळ १८ कोटी ३५ लाख २४ हजार
मुळशी १५ कोटी ५० लाख ९४ हजार
पुरंदर ३२ कोटी २८ लाख ७३ हजार
शिरूर ७२ कोटी ५९ लाख २३ हजार
वेल्हा ३ कोटी ८९ लाख ४४ हजार
एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रूपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT