Distribution of crop loan only 31% in Parbhani district
Distribution of crop loan only 31% in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात ३१ टक्केच पीककर्जाचे वाटप

टीम अॅग्रोवन

परभणी ः या वर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे. परंतु राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बॅंकांचे पीक कर्जवाटप अडखळत सुरु आहे. शनिवार (ता.१७) पर्यंत सर्व बॅंकांनी मिळून एकूण ६५ हजार ५९१ शेतकऱ्यांना ३७६ कोटी २१ लाख रुपये (३१.०१ टक्के) पीक  कर्जवाटप केले. आजवरच्या वाटपात ६ हजार ६५ शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज दिले. तर, ५९ हजार ५२६ शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नूतनीकरण केले.

जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी क्षेत्रातील एकूण १७ बॅंकांना चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना ७८१  कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १४२  कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे.

सर्वाधिक उद्दिष्टाच्या राष्ट्रीयकृत (वाणिज्यक) बॅंकांनी आजवर ११  हजार ७५२ शेतकऱ्यांना ११८ कोटी ७८ लाख रुपये (१५.२० टक्के), खासगी बॅंकांनी १ हजार ३५५ शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये (१६.०१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १० हजार ४३९ शेतकऱ्यांना ८९ कोटी ६४ लाख रुपये (४७.७७ टक्के), जिल्हा बॅंकेने ४२ हजार ४५ शेतकऱ्यांना १५१ कोटी ५९ लाख रुपये (१०६.१३ टक्के) पीक कर्जवाटप केले. सर्व बॅंकांनी मिळून आजवर ६ हजार ६५ शेतकऱ्यांना ६२ कोटी ३५ लाख रुपयाचे नवीन पीक कर्जवाटप केले. एकूण ५९ हजार ५२६ शेतकऱ्यांनी ३१३ कोटी ८६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT