फसवणूक प्रकरणातील संचालकांची जामिनासाठी पळापळ
फसवणूक प्रकरणातील संचालकांची जामिनासाठी पळापळ 
मुख्य बातम्या

फसवणूक प्रकरणातील संचालकांची जामिनासाठी पळापळ

टीम अॅग्रोवन

वाशीम : येथील खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत गेल्या हंगामात शेतकऱ्यांचा शेतमाल ऑनलाइन नोंदणी पद्धतीने खरेदी करणे गरजेचे असताना तो ऑफलाइन खरेदी करून शेतकरी व शासनाची फसवणूक; तसेच एक कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांच्या शेतमालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली अाहे. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून संबंधितांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सोमवारी (ता.२४) सुनावणी होण्याची शक्यता अाहे.  वाशीम खरेदी-विक्री संस्थेत घडलेल्या या प्रकरणात १५ संचालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले अाहेत. मुळात हा प्रकार समोर येऊन बरेच दिवस झाले होते. मात्र, यासंदर्भात वेगाने कार्यवाही केल्या गेली नव्हती. वाशीम खरेदी-विक्री संस्थेला शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी एजन्सी म्हणून मान्यता दिली होती. शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करून तो माल नाफेडसाठी खरेदी करण्याची जबाबदारी असताना शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्यात अाली. ऑफलाइन पद्धतीने माल खरेदी केला. या खरेदी केलेल्या मालापैकी ४८८ क्विंटल तूर, अाणि दोन हजार ५०९ क्विंटल हरभरा अकोला येथे विकल्याची चर्चा अाहे.   प्रशासकीय स्तरावरून या प्रकरणात कोणतीही हालचाल झाली नव्हती. या प्रकरणात सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांनी वाशीम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात अाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधितांकडून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात अाला. न्यायालय यामध्ये सोमवारी अादेश देण्याची शक्यता अाहे. न्यायालयाचा अादेश नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT