Direct sales of 4 tons of fruits, vegetables
Direct sales of 4 tons of fruits, vegetables 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४ टन फळे, भाजीपाल्याची थेट विक्री

टीम अॅग्रोवन

पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे. मागील नऊ दिवसांत दोन हजार ६९१ गटांनी एक हजार ५६८ ठिकाणी सुमारे १२४ टन भाजीपाल्याची थेट विक्री केली आहे. सध्या ही मागणी वाढत असून ग्राहकांनी योग्य ती काळजी घेऊन फळे व भाजीपाल्याची खरेदी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी उपसंचालक विजय कानडे यांनी दिली.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विक्रेते चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी करत होते. 

नागरिकांनी त्यांच्या सोसायटीमध्येच परवडणाऱ्या किमतीत ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा पर्याय समोर आला आहे. या अंतर्गत कृषी विभाग व आत्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकरी गट व शेतकरी कंपन्या यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शेतकरी, गट, कंपन्या यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फळभाज्या, भाजीपाला व फळांची यादी तयार करण्यात आल्या होत्या. 

शेतकरी गट, कंपनीकडून पुरवठा होऊ शकणारा भाजीपाला फळभाज्या आणि फळे यांचा दर यांची माहिती असणारा फॉर्म भरून घेण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण करून देण्यावर भर दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी व गटांनी भाजीपाला २७ मार्चपासून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली थेट विक्री करण्यास सुरूवात केली.  

सध्या पुणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ६९१ शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना विक्रीसाठी शहरातील सुमारे एक हजार ५६८ ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल घेऊन शेतकरी थेट विक्री करू लागले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. याशिवाय तालुका स्तरावर व गावपातळीवरही अनेक शेतकरी गट विक्री करत आहे. त्यामुळे गावागावातील नागरिकांना फळे व भाजीपाला उपलब्ध होत आहे.

शेतकरी गटांकडून खबरदारी

  • भाजीपाला काढणी करताना हातात हॅन्ड ग्लोज वापरला जातो
  • तोंडाला मास्क लावला जातो
  • भाजीपाला भरताना, पॅकिंग करताना सॅनिटायझरचा वापर केला जातो
  • ग्राहकांना रांगेत अंतर ठेऊन विक्री केली जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT