dilip zende
dilip zende  
मुख्य बातम्या

गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडे

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडे यांची नियुक्ती झाली आहे. कायमस्वरूपी संचालकपदाच्या पदोन्नती प्रक्रिया अपूर्ण आहेत. त्यामुळे झेंडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.  आधीचे गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे निवृत्त झाल्याने या पदासाठी प्रचंड चुरस होती. कृषी खात्यातील अत्यंत अभ्यासू तसेच सर्व विभागांची बारकाईने माहिती असलेला अधिकारी म्हणून श्री. झेंडे परिचित आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते राज्यात सर्व प्रथम आल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागात पीक संरक्षण अधिकारी म्हणून झाली.  महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातून कीटकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या झेंडे यांनी कृषी खात्यात २९ वर्षे सेवा केली आहे. राज्याच्या बियाणे, खते व कीटकनाशके उद्योगातील प्रशासकीय तसेच तांत्रिक घडामोडींचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. सध्या पुणे कृषी सहसंचालकपदी कार्यरत असलेल्या झेंडे यांनी खात्यांतर्गत अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली आहेत.  कृषी आयुक्तालयात अतिशय महत्वाच्या राज्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारिपदी झेंडे यांनी चार वर्षे उत्तम काम केले. याच कालावधीत त्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके उद्योगाशी संबंधित यंत्रणांची तांत्रिक घडी बसवली.  पुढे फलोत्पादन अभियानात प्रकल्प व्यवस्थापक आणि त्यानंतर पुण्याचे कृषी सहसंचालक म्हणून झेंडे यांनी उत्तम कामगिरी बजावली. सध्या शासनाने त्यांना प्रक्रिया व नियोजन संचालकपदाचा देखील जादा पदभार दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT