In Dhule district, the Department of Agriculture moved for military larvae survey
In Dhule district, the Department of Agriculture moved for military larvae survey 
मुख्य बातम्या

धुळे जिल्ह्यात लष्करी अळी सर्वेक्षणासाठी कृषी विभाग सरसावला

टीम अॅग्रोवन

देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुकास्तरावर समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष शेती शिवारात पाहणीसाठी कृषी विभागाचे कृषी मंडळाधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. 

मंगळवारी (ता.१४) ‘ॲग्रोवन’ ने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल जिल्हा कृषी विभागाने तात्काळ घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे म्हणाले, ‘‘लष्करी अळी मल्टिफिडर आहे. कोणत्याही पिकावर येऊ शकते. प्राथमिक टप्प्यात अळीची अवस्था आहे.

यंदा लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकरी चार फेरोमोन सापळे व स्पोडोप्टेरा फ्रुगीफर्डा लुर्स लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक मंडळात क्षेत्रीय पाहणी करून कार्यवाही सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना लष्करी अळीची माहिती देऊन मार्गदर्शिक पुस्तिका वाटप करीत आहोत.’’ 

कुसूंबा मंडळात ४ हजार ४०१ हेक्टरवर मका लागवड आहे. क्रॉपसॅप (किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ) योजनेअंतर्गत देऊर, भदाणे, नेर, खंडलाय, मोराणे प्र. नेर, लोहगड, लोणखेडी येथे मका पीक शेतकरी शेतीशाळांव्दारे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन माहिती देण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी, विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ, मंडळाधिकारी बियाणे, बोंडअळी, लष्करी अळी, पीक समस्येची दखल घेतील.  प्रतिक्रिया.. सकाळ ‘अॅग्रोवन’मधील वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्यात चारही तालुक्यांत समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्ष शेती शिवारात जाऊन कृषी विभागाचे मंडळाधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक पाहणी सर्वेक्षण करून तसा अहवाल तयार करीत आहेत. अळीचे अधिक प्रमाण असेल, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी निंबोळी अर्क, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. कृषी विभाग प्रयत्नशील आहे.’ - विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT