In Devgaon, citrus cuttings are stolen from animals
In Devgaon, citrus cuttings are stolen from animals 
मुख्य बातम्या

देवगावात मोसंबीची कलमे जनावरांकडून फस्त

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील असलेल्या देवगाव येथील एका शेतकऱ्याची मोसंबीची कलमे मोकाट जनावरांनी रात्रीतून फस्त केली. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुकाअंतर्गत येत असलेल्या देवगाव लगतच्या थापटी तांडा जवळील ई क्लास जमिनीतील झाडीत पावसाळ्यात जवळपास दीडशेच्यावर मोकाट जनावरांचा मुक्काम असतो. त्यांचा उपद्रव कापूस वेचणी संपेपर्यंत देवगाव, देवगाव तांडा, थापटी तांडा, रजापूर, आदी गावांतील पिकांना मोठ्या प्रमाणात होतो. या विषयी चार ते पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनासह वन विभागाकडे देवगाव सह परिसरातील गावचे ग्रामस्थ निवेदने देत आहेत. परंतु, त्यांच्या निवेदनाला प्रतिसाद देण्याचे काम प्रशासन व संबंधित यंत्रणेकडून होत नसल्याची स्थिती आहे. 

परिणामी, चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी येणारी पिके फस्त करण्याचे काम मोकाट जनावरे करीत आहेत. २७ जूनच्या मध्यरात्री देवगाव येथील सोमीनाथ गिते यांच्या शेतातील जवळपास दोन दिवसापूर्वी लागवड केलेली मोसंबीची चारशे कलमे या मोकाट जनावरांनी फस्त केली. वारंवार दाद मागूनही या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग व प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. निदान शासनाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  जीव धोक्यात घालून जागरण 

थापटी तांडा परिसरात असलेल्या दाट झाडीत पावसाळ्याच्या सुरुवातीला ही मोकाट जनावरे येऊन तळ ठोकतात. तिथूनच दिवसा झाडीत आराम व रात्री त्यांचे परिसरातील विविध गावातील पिकांवर आक्रमण सुरू असते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री जागरण करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT