मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मुख्य बातम्या

राज्य सरकार गायींचा विमा उतरविणार ः मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन

जालना : गायींचा १०० टक्के विमा शासनातर्फे उतरविण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास ती सार्वत्रिकरीत्या राबविण्याचा विचार करता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद येथे पशुधनाच्या लिंगनिहाय रेतमात्रा निर्मिती प्रयोगशाळेलाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला. जालना येथे सुरू असलेल्या महा पशुधन एक्स्पो २०१९ च्या समारोपीय सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ४) हजेरी लावली. त्या वेळी ते बोलत होते. प्रास्ताविक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. प्रस्ताविकातून पशुधनाच्या औषधांची जनेरीकची दुकाने द्या, मराठवाड्यात पशुधनाच्या रेतमात्रा प्रयोगशाळा द्या, कोणताही पशुपक्षी चारा-पाण्याविना राहणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करा आदी मागण्या त्यांनी केल्या.   यावर मुख्यमंत्री म्हणाले, की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षी जगणे आवश्यक आहेत. पशुपालक निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठीच काम करताहेत.  दुग्धव्यवसाय वा पूरक जोड शेतीला नसलेल्या भागात शेतकरी आत्महत्या होताना दिसतात. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी महा पशुधन एक्स्पोला भेट देऊन त्यांना नेमकी कशाची गरज होती, हे दाखवून दिले आहे. कापूस, सोयाबीनसारख्या पिकाकडे वळल्याने पशुखाद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने मराठवाडा व विदर्भात २४३ कोटींची योजना आणली. पशुखाद्याची निर्मिती, प्रशिक्षण आदींसाठी गट तयार करून मदतीचे धोरण आखले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. माणसासाठी लागणाऱ्या औषधांची जेनेरिक औषधी दुकान आहेत. मग पशुपक्ष्यांसाठी का नाही? म्हणून पशुसंवर्धन खात्याने लागलीच पशुधनासाठी लागणाऱ्या औषधांची जनेरीकची दुकान सुरू करण्याची प्रक्रिया करावी. यासोबतच माणसांप्रमाणे पशूंसाठीही ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.  ‘‘पशुधनाला आवश्यक तेथे व आवश्यक ते उपचार तत्परतेने मिळण्याची सोय यामध्ये असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम दर्जाची जातिवंत जनावरे पैदा व्हावी, यासाठी औरंगाबाद येथे लवकरच पशुधनाच्या लिंगनिहाय रेतमात्रा निर्मितीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही आपले विचार मांडले. शासनाने आजवर शेतकऱ्यांना संकटात मदत केल्याची आकडेवारीसह माहिती त्यांनी दिली. या वेळी मंचावर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार नारायण कुचे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळ आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री पशुधन योजना राज्यात मुख्यमंत्री पशुधन योजना राबविण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली. या योजनेची विस्तृत माहिती दिली नसली, तरी मागेल त्याला पशुधन, त्यासाठी लागणारी सर्वंकष मदत हा योजनेचा गाभा असेल, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रत्येक गटातील विजेत्यांचा गौरव प्रत्येक गटात प्रथम आलेल्या पशुपालकाचा लाखाचे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. युवराज व सुलतान या रेड्यांच्या मालकांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT