विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या : फडणवीस
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या : फडणवीस 
मुख्य बातम्या

विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या : फडणवीस

टीम अॅग्रोवन

नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनाची व राष्ट्रीय अस्मितेची असल्याने देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना संधी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (ता. २४) केले. सटाणा येथील पाठक मैदानावर धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्री. फडणवीस बोलत होते.  व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, दादाभाऊ भुसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. प्रशांत पाटील, अण्णासाहेब सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे,  शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, माजी आमदार दिलीप बोरसे, नीलेश कचवे, साहेबराव सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘गरिबांच्या कल्याणासाठी खरी लढाई मोदींनी केली. ८० हजार कोटी गरिबांचे जनधन योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडले. मोदींनी ‘न खाऊंगा न खाने दुंगा’,  याप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात निधी वर्ग केला. स्वच्छ प्रशासनामुळे आबू नाही, बाबू नाही, दलाल नाही. त्यामुळे काँग्रेसने उभी केलेली भ्रष्टाचारी फौज दूर झाली. उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत योजना या जनहिताच्या योजना राबवित शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. सटाणा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या पुनद पाणी योजनेस विरोध असलेल्या कळवण व देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांशी समन्वय साधून योजना मार्गी लावण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. उमेदवार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, ‘‘बागलाण तालुक्यातील गेल्या २५ वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प सोडविण्यात यश आले. ज्या योजना काँग्रेस शासनाच्या काळात मापदंडात बसल्या नाहीत, त्यांना पुन्हा मंजुरी घेऊन कामे मार्गी लावली. उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा एकदा बागलाणच्या जनतेने संधी द्यावी’’ असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. मंत्री महाजन, रावल आदींची भाषणे झाली. सभेस नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT