आंबा फळाच्या उत्पन्नवाढीस शास्त्रशुद्ध पद्धतीने संधी
आंबा फळाच्या उत्पन्नवाढीस शास्त्रशुद्ध पद्धतीने संधी 
मुख्य बातम्या

आंबा फळाच्या उत्पन्नवाढीस शास्त्रशुद्ध पद्धतीने संधी

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग ः आंब्याच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा सध्याच्या घडीला ४० टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. परंतु बागायतदाराने शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून बागेचे योग्य व्यवस्थापन राखल्यास भारताचा जागतिक स्तरावरील उत्पन्नाचा वाटा वाढून तो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊ शकेल, असा आशावाद डॉ. पिग लू व डॉ. झोरा सिग या परदेशी  शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी शास्त्रज्ञांनी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत ऊर्फ दाजी परब यांच्या रामघाट रोडनजीकच्या आंबा बागेला भेट देऊन हापूस व केशर कलमांसह आंब्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी परब यांनी आंबा फळांची काढणी, पॅकेजिंग, खतांच्या मात्रा, पीक संरक्षणाच्या उपाययोजना याबाबत परदेशी शास्त्रज्ञांना माहिती दिली. या भेटीवेळी स्पेन कॅनरी आयलॅड कृषी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. व्हिक्‍टर गॅलन, चार्ल्स डार्विन विद्यापिठ ऑस्ट्रेलियाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पिग लू, चियांग माई विद्यापीठ थायलंडच्या डॉ. दारुनी नेफॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ डॉ. झोरा सिग, वेंगुर्ले संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत, महेश शेडगे, डॉ. ए. वाय. मुंज उपस्थित होते.    दृष्टिक्षेपात परिषद

  •  जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा : ४० टक्के
  •  योग्य व्यवस्थापन राखल्यास वाटा किती वाढेल : ५० टक्केच्या वर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT