संत्रा पट्ट्यांत पाण्याच्या उपशामुळे वाळवंट
संत्रा पट्ट्यांत पाण्याच्या उपशामुळे वाळवंट 
मुख्य बातम्या

संत्रा पट्ट्यांत पाण्याच्या उपशामुळे वाळवंट

टीम अॅग्रोवन

नागपूर ः अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी या संत्रा पट्ट्यांचे पाण्याच्या उपशामुळे वाळवंट झाले. त्यानंतर आता संत्रा, केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍याचीदेखील ड्रायझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. परिणामी सातपुडा पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी केळी आणि संत्रा काढण्यावर भर दिला आहे. 

सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्रामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी वरुड, मोर्शी तालुक्‍यांची ओळख. या पिकासाठी पाण्याचा सातत्याने होणारा उपसा आणि तुलनेत पुनर्भरणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या भागाला आता ‘ड्रायझोन’ अशी ओळख मिळाली आहे. या भागात बोअरवेल खोदण्यावरदेखील बंदी लादण्यात आली आहे. बंदीमुळे चोरून लपून बोअरवेल खोदून देणाऱ्यांचा व्यवसाय फोफावला. त्यातूनच अनेक अवैध प्रकारही घडू लागले. याच वाटेवार आता अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील अनेक गावे जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

या भागात संत्रा आणि केळीसारखी अधिक पाणी लागणारी पिके घेतली जातात. पाण्याअभावी ही पिके शेतकऱ्यांना सोडावी लागत आहेत. जूनमध्ये लागवड करण्यात आलेली केळी त्यानंतर चारच महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकली. संत्र्यांच्या मृग बहाराची फळे झाडांसह सुकली, अशी विदारक स्थिती या भागात निर्माण झाली आहे.

प्रकल्पदेखील कोरडे पडले अकोट तालुक्‍यातील बहुतांशी गावे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहेत. या भागात सरासरी एक किलोमीटरवर एक नाला आहे. पर्वतरांगांमधून येणारे पाणी नाल्याच्या माध्यमातून काही अंशी पुनर्भरणाचे काम करीत होते. गेल्या काही वर्षांत पावसाअभावी हे नाले वाहिलेच नाहीत. खिरकुंड, चिचपाणी, शहापूर-२, अंबाडी, पोपटखेड यासारखे प्रकल्पदेखील कोरडे पडले आहेत.

वर्ष १९७२-७३ मध्ये २० ते २५ फुटांवर पाणी लागत होते, त्या वेळी पहिल्यांदाच ओलिताचे प्रयत्न झाले. बैल बांधण्याकामी असलेल्या दोरानेच विहिरीतील पाणी उपसता येत होते. पाण्याचा सातत्याने होणारा उपसा आणि पुनर्भरणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज पाणीपातळी खोल गेली आहे. रुईखेड परिसरात ६०० फुटांपर्यंत बोअरवेल आज घेतल्या जातात. परंतू त्याला पाणी लागेल किंवा नाही याची गॅरंटी नाही. आमच्या गावात अनेकांनी पाण्याच्या शक्‍यतेने चार-पाच बोअरवेल खोदले, परंतू यातील एकालाही पाणी लागले नाही. - प्रभाकरराव मानकर, प्रयोगशील शेतकरी, रुईखेड, ता. अकोट, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT