Deola taluka hits onion for climate change
Deola taluka hits onion for climate change 
मुख्य बातम्या

देवळा तालुक्यात हवामान बदलाचा कांद्याला फटका 

टीम अॅग्रोवन

नाशिक : हवामान बदलामुळे ढगाळ राहिलेले वातावरण, मार्चअखेर झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. देवळा तालुक्यातील अनेक भागात कांद्याची पात करपून गेल्यामुळे कांद्याची वाढ खुंटल्याने एकरी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे खरिपानंतर पुन्हा एकदा कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहे. 

मार्चअखेर झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक बाधित झाले आहे. यापूर्वी खरीप कांद्यामध्ये कंदसड झाल्याने उत्पादकता कमालीची घटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर उन्हाळ कांद्याची रोपे अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी दुबार रोपे त्यात करून तर रोपे खरेदी करून लागवडी केल्या. त्यामुळे कांदा रोपे, लागवड खर्च यावर अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यात आता हवामान बदलांमुळे रोगाचा प्रादुर्भाव कांद्यावर झाला आहे. 

तालुक्यातील लोहोणेर, ठेंगोडा, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा परिसरात हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या लागवडी फेब्रुवारीच्या मध्यावधीत झाल्या त्यामध्ये हा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. कांदा पोसण्याच्या दरम्यान पात करपून गेली आहे.त्यामुळे कांद्याची अपेक्षित वाढ होणार नसल्याचे एकरी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

एकीकडे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक कोंडीला सामोरा जात आहे. जी पिके हातात असून विक्रीयोग्य असताना लॉकडाऊनमुळे विक्रीत अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे दराचा फटका सहन करावा लागत आहे.

ही आहे स्थिती :

  • पिकाचा कालावधी पूर्ण न होता कांदापात करपली
  • कांद्याची वाढ न झाल्याने आकार व वजन आलेले नाही
  • एकरी उत्पादनात घट होण्याची शक्यता
  • उन्हाळ कांद्याच्या लागवडी अनेक अडचणी पार करून झाल्या. त्यात रोपांची उपलब्धता, जास्त मजुरी देऊन लागवडी केल्या. मात्र, हवामान बदलांमुळे कांद्याची पात करपून जाऊन कांद्याची वाढ झालेली नाही. आता पूर्ण पीक कालावधी न होऊनही कांदे काढून घ्यावे लागतील. मात्र, उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. - अमर जाधव, कांदा उत्पादक, भऊर, ता. देवळा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

    Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

    Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

    Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

    Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

    SCROLL FOR NEXT