ऊस रोपांच्या मागणीत मोठी वाढ 
मुख्य बातम्या

ऊस रोपांच्या मागणीत मोठी वाढ

Raj Chougule

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातून ऊस रोपांना मागणी वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिका व्यावसायिकांमध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. पूर ओसरल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऊस रोपांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक रोपवाटिकांमध्ये एक महिन्यापर्यंतचे ऊस रोपांचे ॲडव्हान्स बुकिंगही झाले आहे. रोपे तयार करण्यासाठी बेणे कमी पडत असल्याने मागणीचे आव्हान पूर्ण करण्याची कसरत रोपवाटिका चालकांना करावी लागत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात शेकडो रोपवाटिकांचे जाळे पसरले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह अन्य भागातही गेल्या काही वर्षात रोपवाटिका तयार करण्याकडे कल वाढला. विशेष करून शेतकऱ्यांनी जोड धंदा म्हणूनही ऊस रोपवाटिका करण्याकडे प्राधान्य दिले. गेल्या वर्षातील जून पर्यंत दुष्काळामुळे रोपवाटिकांमधून ऊस रोपांची मागणी फारशी नव्हती. यातच ऑगस्ट महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्रातही महापुराने थैमान घातले. यामुळे येथील ऊस लागवडही खोळंबली. याचा परिणाम रोपे शिल्लक राहण्यावर झाला. मागणी नसल्याने लाखो ऊस रोपे खराब झाली. महापूर येऊन गेल्यानंतर व राज्यातील अतिवृष्टी थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यास प्रारंभ केला. शेतकऱ्यांचा रोप लागणीकडे ओढा  रोपे लावल्यास तब्बल एक महिन्याचा कालावधी वाचतो. यामुळे शेतकऱ्यांनी कांडी लावण करण्यापेक्षा थेट ऊस रोपांना प्राधान्य दिले. शेत तयार केल्या केल्या रोपे लावल्यास चांगली वाढ होत असल्याचे लक्षात येताच राज्यभरातून ऊस रोपांना मागणी वाढली. याचा सकारात्मक परिणाम ऊस रोपवाटिका चालकांना झाला. गेल्या दोन महिन्याचा आढावा घेतल्यास ऊस रोपांच्या मागणीत वाढच होत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रातून को ८६०३२, २६५, १०००१ आदी जातीच्या ऊस रोपांना अधिक मागणी आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातून या जातीसह ८००५ जातीला मागणी येत असल्याचे प्लॉटधारकांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून ऊस रोपांची मागणी चांगली आहे. महापुराच्या काळात आमची परिस्थिती बिकट होती. पण त्यानंतर मागणीत सातत्य राहिले. सध्याही अपवाद वगळता रोपांना दररोज मागणी आहे. रोपांचे विक्री दरात वाहतुकीच्या अंतरानुसार काही प्रमाणात वाढ झाली आहे.  - राजू पुजारी, रोपवाटिका चालक, तमदलगे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

SCROLL FOR NEXT