Demand in Nagar district, rates increased
Demand in Nagar district, rates increased 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात आल्यास मागणी, दर वाढले

टीम अॅग्रोवन

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक काढा आणि चहासाठी आले (अद्रक) व गवती चहाचा वापर वाढला आहे. परिणामी गेल्या चार महिन्यांत आल्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातही प्रति क्विंटलमागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात आले १०० ते १४९ रुपये किलोने विकले जात आहे. नगर बाजार समितीसह जिल्हाभरातील बाजार समितीत दर दिवसाला आल्याची ८० ते १०० क्विंटलची खरेदी-विक्री होत आहे. विशेष म्हणजे फार कधी बाजारात न दिसणारा गवती चहाही आता किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे.

पाच महिन्यांपासून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहेत. अलीकडच्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ‘कोरोना’वर अजून कोणतेही प्रभावी औषध नसले तरी त्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेण्याचे सोशल मिडीयासह विविध घटकांकडून आवाहन केले जात आहे. या काढ्यात आल्याचा (अद्रक) वापर करण्याचे सांगितले जात आहे. याशिवाय चहातही आल्याचा वापर वाढत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून आल्यास दुपटीने मागणी वाढली आहे.

नगर बाजार समितीत दर दिवसाला २५ क्विंटलपर्यंत तर जिल्हाभरात साधारण ८० ते १०० क्विंटल आल्याची खरेदी-विक्री होत असल्याचा जाणकाराचा अंदाज आहे. चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात आल्याला २००० ते ३००० रुपये क्विंटलचा दर मिळत होता. तो आता ४००० ते ५००० रुपयांवर गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आल्याचा हा दर टिकून आहे.  

आल्याच्या शेतीला प्राधान्य नगर, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव आदी मोठ्या शहरांसह सर्वच भागात आल्याला मागणी वाढली आहे. आले उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असून नगर जिल्ह्यात आले लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. सर्वसाधारण पाच ते सात हजार हेक्टरवर आल्याचे उत्पादन घेतले जाते.

आल्याचे पीक हे कमी कालावधीचे आहे. त्यामुळे आल्याची शेती फायद्याची ठरत आहे. अलीकडच्या काळात मागणीही चांगली आहे. - किशोर मिसाळ, शेतकरी, भेंडे, जि. नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT