onion stock limit
onion stock limit 
मुख्य बातम्या

कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन

नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कांदा खरेदीवर परिणाम होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर कोंडी सोडवण्यासाठी साठवणूक मर्यादा वाढवून द्या, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.  याबाबत खासदार पवार यांनी मंत्री दानवे यांची बुधवारी (ता.२८) भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. कांदा व्यापारी व शेतकरी यांचा कांदा खराब होऊ नये म्हणून तातडीने पुढच्या दहा दिवसांची मुदत देऊन विक्रीसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच कांदा साठवणूक क्षमताही वाढवून देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा.  लवकरच व्यापारी वर्गाशी चर्चा करून सुवर्णमध्य काढू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री दानवे यांनी दिल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. चंद्रकांत पाटलांचे वाणिज्य मंत्र्यांना पत्र घाऊक व्यापाऱ्यांची साठवणूक मर्यादा मर्यादा २५ टनांवरून १०० टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनांवरून १०  करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही लवकरच दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकार त्वरित सकारात्मक पाऊल उचलेल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT