Demand for concession on loan of two lakhs
Demand for concession on loan of two lakhs 
मुख्य बातम्या

दोन लाखांवरील कर्ज भरण्यासाठी सवलतीची मागणी

टीम अॅग्रोवन

नाशिक : राज्यात दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९,९१६ सभासदांना दिलासा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मात्र चालू वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने २ लाखांवरील रक्कम भरण्यासाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत हप्ते तसेच त्याची मुदत वाढून मिळावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हा बँकेने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ अखेर एकूण १९,८२२ शेतकऱ्यांना कर्ज वितरीत केले होते. त्यामध्ये ४६ शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन प्रकरणे असे मिळून असे एकूण १९,९१६ खाती आहेत. त्यासाठी ५४३ कोटी ४ लाख १५ हजार इतकी रक्कम वितरित केली आहे. प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा व ऊस पिकासाठी या रकमेचे वाटप झाले आहे.

 सरकारच्या निर्णयामुळे बँकेला ३९८ कोटी ३२ लाख प्राप्त होणार आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला बोजा २ लाखांपर्यंत हलका होणार आहे. मात्र, त्यावरील कर्ज संबंधित खातेदारास अगोदर भरावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना फायदा तर होईल. मात्र, वरील उत्पन्न नसल्याने रकमेच्या भरण्याबाबत नियोजन करावे लागणार आहे. २ लाखांवरील कर्जाची रक्कम नेमकी कशी भरायची याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे २ लाखांवरील रकमेचे हप्ते करून घ्यावेत व ही रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कर्जदार शेतकरी करत आहेत.

सरकारने दिलासा दिला आहे. मात्र, चालू वर्षी द्राक्ष हंगाम वाया गेला, त्यामुळे उत्पन्न हाती आलेले नाही. त्यामुळे दोन लाखांवरील रकमा कशा भरायच्या हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. सरकारने आम्हाला हप्ते करून वरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.  - नितीन निफाडे, द्राक्ष उत्पादक, शिरवाडे वणी, ता. निफाड 

सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर येताना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ती पूर्ण केलेली नाही. दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र मागील पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे घेतलेले व पुनर्गठन केलेले कर्ज प्रकरणाचे हप्ते न भरता आल्याने बोजा वाढला आहे. म्हणून सरकारने आता हा तुटपुंजा प्रयत्न करत असताना दोन लाखांच्या वरील रकमेवरील व्याज माफ करून मुद्दलीमध्ये ५० टक्के सूट द्यावी. - कैलास भोसले, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT