अकोल्यात रब्बीसाठी ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी
अकोल्यात रब्बीसाठी ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी 
मुख्य बातम्या

अकोल्यात रब्बीसाठी ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

टीम अॅग्रोवन

अकोला : या वर्षात जिल्ह्यात चांगला पाऊस आणि प्रकल्पांमध्ये साठा झाल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढू शकते. हंगामात एक लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी लागवड अपेक्षित धरली जात असल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाने ९६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी अायुक्तालयाकडे नोंदविली अाहे.

रब्बी हंगामाला पुढील महिन्यापासून जोरदार सुरवात होणार अाहे. शेतकरी सुरवातीलाच मूग, उडिदाची काढणी झाल्यानंतर रब्बीच्या लागवडीला लागतात. शिवाय सोयाबीनची काढणी झाल्यानंतर याला अधिक वेग येतो. जिल्ह्याचे रब्बीसाठी सरासरी एक लाख २ हजार ५२० हेक्टर क्षेत्र राहते. मागील वर्षी कमी पाऊस व प्रकल्पसुद्धा न भरल्याने रब्बीवर त्याचा थेट परिणाम झाला होता. लागवड ५० टक्क्यांपर्यंत सुद्धा पोचली नव्हती. यावर्षीची स्थिती वेगळी दिसत अाहे. पावसाने सरासरी गाठली. प्रकल्पसुद्धा भरल्याने रब्बीत सिंचनासाठी पाणी मिळणार हे निश्चित झाले अाहे. यामुळेच यंदाचा रब्बी हा सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा यंत्रणांना वाटते अाहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा पिकाचे लागवड क्षेत्र सर्वाधिक असते. यानंतर गहू, रब्बी ज्वारीकडे शेतकरी वळतात. वाढणारे अपेक्षित क्षेत्र पाहून बियाणे, खतांमध्ये वाढ केली जात अाहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया २२ हजार मेट्रीकटन, डीएपी २० हजार, एसएसपी १८०००, १०ः२६ः२६ खताची ७ हजार मेट्रिक टनाची प्रमुख मागणी अाहे.  याशिवाय एमअोपी ५००० मेट्रीक टन, १६ः२०ः०ः१३ खताची ५०००  यासह इतर खते मिळून ९६००० मेट्रीक टनांची मागणी अायुक्तालयाकडे पाठवण्यात अाली अाहे. लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता अाहे.

दृष्टिक्षेपात 

  • सरासरी क्षेत्र-१ लाख २५२० हेक्टर
  • अपेक्षित लागवड-१ लाख ३० हजार हेक्टर
  • खताची मागणी -९६ हजार मेट्रिक टन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT