संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे  'सीट्रस इस्टेट' कार्य करेल ः डाॅ. बोंडे
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे 'सीट्रस इस्टेट' कार्य करेल ः डाॅ. बोंडे  
मुख्य बातम्या

संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे 'सीट्रस इस्टेट' कार्य करेल ः डाॅ. बोंडे

टीम अॅग्रोवन

अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी  'सीट्रस इस्टेट' कार्य करेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री व पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज उमरखेड येथे केले.  कृषी विभागातर्फे मोर्शी तालुक्यातील उमरखेड येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेत 'सीट्रस इस्टेट'चे उद्घाटन करताना ते बोलत होते. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, पंचायत समिती सदस्य मायाताई वानखडे, उमरखेडचे सरपंच विजय चेर, जैन इरिगेशनचे धारीवाड या वेळी उपस्थित होते. कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, काटोल, मोर्शी व आष्टी येथे प्रत्येकी १० कोटी रुपये 'सीट्रस इस्टेट'साठी देण्यात आले आहेत. लागवडीपासून संत्रा प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही संस्था काम करेल.   पंजाबमध्ये 'सीट्रस इस्टेट'च्या माध्यमातून तिथे उत्पादित संत्रा निर्यात, विक्रीसाठी लाभ झाला. त्या धर्तीवर नागपुरी संत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात उत्पादित संत्र्याची विपणन साखळी, उत्पादनाबाबत समस्यांचे निराकरण यासाठी 'सीट्रस इस्टेट' कार्य करेल. 'सीट्रस इस्टेट'ची संकल्पना सर्वप्रथम पंजाबमध्ये राबवली गेली. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांच्या प्रयत्नामुळे ही संकल्पना जिल्ह्यातही साकार होत आहे. ही शासनस्थापित संत्राउत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था असून, जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासह समस्यांचे निराकरण करेल, असे श्री. नागरे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT