पुणे जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात घट
पुणे जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात घट 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात घट

टीम अॅग्रोवन

पुणे ः कमी दर, वेळेवर पाऊस नसल्याने मागील हंगामात तूर पिकाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे चालू वर्षी ही तूर पिकाच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. यंदा खरीप हंगामात अवघे ७४६ हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरी २१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ८५३ हेक्टरने झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात तुरीचे सरासरी तीन हजार ५६३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी गेल्या वर्षी दोन हजार ५९९ हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरी ७३ टक्के पेरणी झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली होती; परंतु तुरीची काढणी झाल्यानंतर उतरलेले दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे चालू वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी तूर पिकाकडे पाठ फिरवली असून, तूर पीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत अवघ्या ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीएेवजी सोयाबीन पिकाला पसंती दिली अाहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली अाहे.

जिल्ह्यात हवेली, पुंरदर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, दौड या तालुक्यात तुरीची दरवर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी होते. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे आणि कमी दरामुळे तुरीचे पीक घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात दहा हेक्टरवर पेरणी झाली आहे. भोरमध्ये ४६, मावळमध्ये ५२, वेल्ह्यामध्ये ६, जुन्नरमध्ये २२३, खेड ६४, आंबेगाव ५३, शिरूर ३०, बारामती २२, इंदापूर ३०, दौंड २५ आणि पुरंदर १८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर मुळशी तालुका तूर पिकांपासून दूर असल्याचे चित्र आहे.

मागील दोन ते तीन वर्षे तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. बाजारात तुरीला कमी दर मिळाल्यामुळे चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांनी तूर पीक टाळले आहे. यंदा सुरवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होते. अशा दोन्ही बाबींमुळे तुरीची पेरणी कमी झाले आहे. - बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT