Decrease in productivity of green gram, black gram in Nanded district
Decrease in productivity of green gram, black gram in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट

टीम अॅग्रोवन

नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल, तर उडदाची ५.७९ क्विंटल आली. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक तालुक्यांत मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट आली आहे.

जिल्ह्यात यंदा २३ हजार २३९ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यंदा मुगाच्या २८८ पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी २८२ प्रयोग घेण्यात आले. त्यांचा विश्लेषणानंतर जिल्ह्याची मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल आली असल्याचे स्पष्ट झाले.

नायगाव तालुक्यातील उत्पादकता सर्वाधिक ९.९३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची सर्वांत कमी ३.२८ क्विंटल एवढी आली आहे. जिल्ह्यातील १६ पैकी नांदेड, लोहा, बिलोली, धर्माबाद, हियामतनगर, किनवट, हदगाव, भोकर या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, मुदखेड, कंधार, देगलूर, नायगाव, मुखेड, माहूर, उमरी या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा अधिक आली आहे.

जिल्ह्यात यंदा २२ हजार ९८३ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. उडदाच्या ४२० पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४०८ प्रयोग घेण्यात आले. एकूण ४०७ प्रयोगांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार उडदाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.७९ क्विंटल आल्याचे स्पष्ट झाले. देगलूर तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक ११.७३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची उत्पादकता सर्वांत कमी २.९५ क्विंटल एवढी आली.

नांदेड, मुदखेड, लोहा, धर्माबाद, माहूर, किनवट, हदगाव या सात तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, कंधार, बिलोली, देगलूर, नायगाव, मुखेड, हिमायतनगर, भोकर, उमरी या नऊ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा जास्त आली आहे. 

तालुकानिहाय प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)

तालुका मूग  उडीद
नांदेड  ४.८०   ४.६८
मुदखेड  ५.६७ ४.७२
अर्धापूर  ६.९१  ६.८२
हदगाव ४.८३ ४.८६
माहूर ५.०३  ४.८७
किनवट  ३.५६  ३.०७
हिमायतनगर ३.८५ ६.२०
भोकर ४.०५ ६.१२
उमरी ६.०४  ७.९४
धर्माबाद ४.१३ ७.९४
नायगाव.  ९.९३ ७.४५
बिलोली ४.७३  ७.३३
देगलूर ८.७५   ११.७३
मुखेड ७.२८  ५.४९
कंधार  ५.८९ ७.५८
लोहा ३.२८  २.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT