Deadline for registration of cotton sales in Parbhani today
Deadline for registration of cotton sales in Parbhani today 
मुख्य बातम्या

परभणीत कापूस विक्री नोंदणीसाठी आज अंतिम मुदत 

टीम अॅग्रोवन

परभणी ः राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस खरेदी महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गूगल लिंक्दारे आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेपर्यंतची अंतिम मुदत आहे. रविवारी (ता. २६) दुपार पर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

दरम्यान, रुई उतारा आणि घट या मुद्यावरुन जिनींग प्रेसिंग उद्योजकांची सहमती होत नसल्याने कापूस खरेदी सुरू होऊ शकलेली नाही. शासकीय तसेच खासगी कापूस खरेदी सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तात्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

तालुकानिहाय शेतकरी नोंदणी संख्या ः  परभणी तालुका ः ६५७३, जिंतूर ः २५७४, सेलू ः ४६६९, मानवत ः ५७९७, पाथरी ः ४२६३, सोनपेठ ः ३३४५, गंगाखेड ः ७३१८, पालम ः ५४२१, पूर्णा ः १०६३ 

आज नोंदणीसाठी अंतिम मुदत  शेतकऱ्यांना https://forms.gleNUASetva७aDakGn३A या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://parbhani.gov.in/ सुद्धा ही नोंदणी करता येत आहे. घरबसल्या भ्रमणध्वनीवरून देखील नोंदणी करू शकत आहेत. सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT