पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच : डॉ. दीपक म्हैसेकर
पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच : डॉ. दीपक म्हैसेकर 
मुख्य बातम्या

पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच : डॉ. दीपक म्हैसेकर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल’’, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी (ता. १) येथे शेतकऱ्यांना दिली.

डॉ. म्हैसेकर यांनी जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, वडाळा, बार्शीतील शेळगाव आणि मोहोळ तालुक्यांतील सावळेश्वर येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांत अधिकारी हेमंत निकम, उपसंचालक रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे सदस्य बळीराम साठे आदी उपस्थित होते.

‘‘नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रे काढून ठेवावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. पीकविमा उतरलेल्या शेतकऱ्यांनी भरपाई मिळण्याबाबतची कागदपत्रे तयार करावी. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी एकत्र येऊन काम करावे, असेही त्यांनी सांगितले. 

डॅा. भोसले  म्हणाले, ‘‘येत्या आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे केले जातील. त्यांच्या आधारे मदतीसाठी अहवाल तयार केला जाईल.’’ म्हैसेकर यांनी वडाळा येथे जयसिंग साठे, कृष्णात साठे, मनोज साठे, धर्मराज साठे विजय साठे यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. सावळेश्वर येथे दत्तात्रय मसलकर, शिवाजी काकडे, शहाजी काकडे, विलास काकडे, धोडिंबा निळ या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT