संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ६३.७४ टीएमसी पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाणलोटातून झरे, ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहिल्याने धरणांत पाण्याची आवक होत आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ६३.७४ टीएमसी (२९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे शहर, हवेली, दौंड, इंदापूरला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात १३ टीएमसी (४५ टक्के) पाणीसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.  

खडकवासला आणि कळमोडी ही धरणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. घोड, पिंपळगाव जोगे आणि नाझरे या धरणांचा पाणीसाठा अद्यापही मृत पातळीतच आहे. भीमा नदीच्या उपखोऱ्यातील नद्यांच्या मुक्त पाणलोटात होत असलेल्या पावसामुळे उजनीला पाणीपुरवठा होत आहे. दौंड येथे भीमानदी पात्रात १९ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. यंदा उजनी धरणाचा पाणीसाठा उणे ६० टक्क्यांपर्यंत खालावला होता. शनिवारी (ता. १३) उजनी धरणात उणे ३६ टक्के पाणीसाठा होता. धरणाच्या अचल पातळीतील ४४.२९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. 

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. गतवर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या झळा यामुळे धरणांतील पाणीसाठा खूपच खालावला. मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने धरणांतील पाणीपातळी वाढत असून, अनेक धरणांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा आहे. गतवर्षी १३ जुलैला धरणांमध्ये ६०.४६ टीएमसी (२८ टक्के) पाणीसाठा होता. 

शनिवारी (ता.१३) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर ०.८४(२३), वरसगाव ४.९४ (३९), पानशेत ५.३२ (५०), खडकवासला १.९७ (१००), पवना ३.४४ (४०), कासारसाई ०.४१ (७३), मुळशी ७.७५ (४५), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ३.१३ (४१), भामा आसखेड २.९७ (४०), आंद्रा २.२१ (६९), वडीवळे ०.७६ (७१), गुंजवणी १.८५ (५०), भाटघर ९.६७ (४१), नीरा देवघर ४.७७ (४१), वीर ६.१९ (६६), नाझरे ० (०), पिंपळगाव जोगा ० (०), माणिकडोह १.४० (१४), येडगाव ०.१७ (९). वडज ५० (४३), डिंभे ३.८२ (३१), घोड ० (०). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT