संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही : दूध संघ

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्याबाबत शासनाने लागू केलेल्या योजनेतून डेअरीचालक अद्याप बाहेर पडलेले नाहीत, असा निर्वाळा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दिला आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे. आम्ही हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही, अशी खंत ​संघाने व्यक्त केली आहे.

शासकीय दूध अनुदान योजनेतून राज्यातील डेअरीचालक १ ऑक्टोबरपासून बाहेर पडत असल्यामुळे दुधाचे भाव कोसळणार असल्याची जोरदार अफवा पसरली होती. त्यामुळे सोमवारपासून दुधाला निश्चित किती भाव मिळणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा सुरू झाली. मात्र, डेअरीचालक अद्यापही योजनेत असून भाव कमी होणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही प्रतिलिटर २५ रुपये भाव दिला आहे. मात्र, आता आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे. आम्ही हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही, अशी खंत संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाशी झालेल्या चर्चेनुसार हिशेब सादर केलेल्या प्रकल्पांना येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास आम्ही ९ ऑक्टोबरला एकत्र येणार आहोत. याच दिवशी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे प्रतिनिधी आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील, असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर भाव देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार डेअरीचालकांनी शेतकऱ्यांना भाव वाढवून दिलेले आहेत. प्रतिदिन किमान ४० लाख लिटर्स दुधाची जादा भावाने खरेदी केल्यामुळे किमान १२० कोटी रुपये अडकून पडलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT