सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात 
सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात  
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात 

टीम अॅग्रोवन

सांगली ः कोरोना विषाणूच्या अभुतर्पूव संकटातही बेदाणा उत्पादन अडथळ्यातून मार्ग काढत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा चालू हंगाम दीड महिना अधिक सुरू राहिला. येत्या दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम विसावेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली. 

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. यंदा महापूर, अतिवृष्टी अशा संकटाची मालिका द्राक्ष उत्पादकांच्यावर सुरू होती. त्यामुळे द्राक्ष हंगाम उशीरा सुरू झाला. मुळात बेदाण्याचा हंगाम डिसेंबर महिन्यातच सुरू होतो. परंतु या नैसर्गिक आपत्तीच्या फटक्‍याने बेदाणा हंगाम उशीरा सुरू झाला. वास्तविक पाहता हंगाम उशीरा सुरू झाला तरी, एप्रिल मध्यावर हंगाम संपला जातो. दरवर्षी सुमारे या परिसरात ५ ते ६ हजार शेडवर बेदाणा तयार होतो. 

हंगाम सुरळीत सुरू होता. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बेदाणा निर्मितीवर संकट आले. तसेच द्राक्ष विक्रीवर थांबली. परिणामी टेबलग्रेप्स थेट बेदाणा शेडवर येऊ लागली. त्यामुळे कवठेमहांकाळ परिसरात गतवर्षीपेक्षा चालूवर्षी एक ते दीड हजार शेडची संख्या वाढली, अर्थात सात हजार शेडवर बेदाणा तयार झाला. 

तासगाव, मिरज, पलूस भागात बेदाणा निर्मिती  द्राक्षे काढणीला होती. परंतु वाहतूक बंद असल्याने द्राक्षे विक्री करता येत नव्हती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी पुढाकार घेतला. वास्तविक पाहता, पूर्वी या पट्ट्यात बेदाणा निर्मिती केली जायची. परंतु इथला शेतकरी द्राक्षाची निर्यात करू लागल्याने बेदाणा तयार करण्याचे बंद केले. मात्र, आर्थिक तोटा होऊ नये यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी बंद असलेले बेदाण्याच्या शेडची दुरुस्ती करुन पुन्हा बेदाणा तयार केला. 

यंदा बेदाण्याचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षीपेक्षा चालु वर्षी हंगाम एक महिना अधिक चालला. बेदाण्याचे सौदे बंद आहेत. सौदे कधी सुरू होतील याची वाट पाहतोय.  - सुनील माळी, बेदाणा शेड मालक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी  केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT