On crops by ‘Agro Ambulance’ Diagnosis, soil test: Mandhare
On crops by ‘Agro Ambulance’ Diagnosis, soil test: Mandhare 
मुख्य बातम्या

‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवरील रोग निदान, माती परिक्षण करा ः मांढरे

टीम अॅग्रोवन

नाशिक : मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्राने ‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवर रोगांचे निदान, माती परिक्षणाचा उपक्रम राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे १० कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला. मांढरे यांनी समक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडून तो स्विकारला. विद्यापीठाचे वित्त अधिकारी एम. बी. पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, उपकुलसचिव विवेक ओक, कैलास मोरे, चंद्रकांत पवार, कैलास मोहिते उपस्थित होते. 

मांढरे म्हणाले, ‘‘ गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये कमालीची घट झाली. वैद्यकीय उपचार घेण्याच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली. इतर आजारांची रूग्णसंख्याही नोंद घेण्याइतपत कमी झाली. येणाऱ्या काळात या बदलांवर आधारित शेती, आरोग्य, सामाजिक, आर्थिक व जीवनशैलीशी संबंधित प्रकल्प मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाद्वारे राबविण्यात येतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महत्वाचे योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करून महाराष्ट्राचे कोरोनानंतरचे भविष्य घडविण्यातही मोलचा वाटा घेतला आहे.’’ 

डॉ. ई .वायुनंदन म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेले हे लोकविद्यापीठ सामाजिक जाणिवेतून सतत आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र संकटात असताना मुक्त विद्यापीठाने ही मदत केली.’’  जीवनशैलींवरील परिणाम अभ्यासणार 

कोरोनाचे जीवनशैलीवर काही सकारात्मक बदलसुद्धा झाले आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासन व विद्यापीठातर्फे कोरोनानंतर शेती, आरोग्य, सामाजिक, आर्थिक व जीवनशैलीवर होऊ घातलेल्या परिणामांवर अभ्यास प्रकल्प राबविण्याचा मानस आहे, असे मांढरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

SCROLL FOR NEXT