Crops leveled by rains in Khandesh
Crops leveled by rains in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात पावसाने पिके भुईसपाट

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात पावसाने कहर केला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस धुळे, जळगावात झाला आहे. सध्या ज्वारी, तीळ, सोयाबीन कापणी, मळणीचा हंगाम सुरू आहे. 

शेतात कापणी झालेल्या पिकांची नासाडी होत आहे. जिल्ह्यात सातपुडा पर्वतालगत बुधवारी (ता.३०) वादळी पाऊस झाला. तर, गुरुवारीदेखील (ता.१) चोपडा, यावल, जळगावात काही भागात जोरदार व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे ज्वारी, कापूस, तूर ही पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांना मोठा फटका ऐन काढणी, मळणीच्या हंगामात बसल्याने आर्थिक संकट आले आहे. 

बुधवारी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी काहिसे कोरडे व सूर्यप्रकाशीत वातावरण होते. नंतर दुपारी वातावरणात झपाट्याने बदल झाले. उकाडा होवू लागला. काळे ढग जमा झाले. दुपारी तीनच्या सुमारास जळगाव, यावल, भुसावळ भागात गार वारा सुटला. 

याच वेळी सातपुडालगत यावल तालुक्यातील सावखेडासीम, कोरपावली व परिसरात जोरदार पाऊस व गारपीट झाली.  ज्वारी, कापूस, तूर ही पिके आडवी झाली. तसेच यावल तालुक्यातील किनगाव, गिरडगाव भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांना कापणी झालेली तीळ, गोळा केलेली ज्वारीची कणसे प्लास्टिकच्या पेपरने झाकावी लागली. त्यात मोठी धावपळ उडाली. 

कापूस भिजला, सोयाबीन पडून

चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा भागातही पाऊस झाला. पावसाने वेचणीवर आलेला कापूस भिजून नुकसान झाले. सोयाबीनही शेतात पडून आहे. 

परिसरात दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वादळात कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले.  - अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम (ता.यावल, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT