Crop-shaped gold grown in the cemetery at Arvi
Crop-shaped gold grown in the cemetery at Arvi 
मुख्य बातम्या

आर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोने

टीम अॅग्रोवन

आर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक संजय वानखडे यांनी स्मशानभूमीत शेती करून आर्वीकरांचे लक्ष वेधले आहे. आर्वी वर्धा रोडवर एसटी डेपोच्या मागे बोहरा समाजाचे सात एकरांत कब्रस्थान आहे. या कब्रस्थानात संजय वानखडे यांनी मागील दोन वर्षांपासून शेती कसत आहेत. प्रा. वानखडे यांनी आतापर्यंत विविध फळझाडे, फुलझाडे लावली असून त्यांनी विविध प्रकारचे पीक घेतले. आता सध्या पपईची बाग त्यांनी लावली आहे. यातून चांगले उत्पन्न त्यांना मिळत आहे. या समाजातील पाहुणेमंडळी, नागरिकही विरंगुळा म्हणून या कब्रस्थानात फिरायला जातात, रममाण होतात.  

बोहरा समाजातील लहान मुलांसाठी या कब्रस्थानात प्रा. वानखडे यांनी बगीचाचे नियोजन केले आहे. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी परिवारांनी इथे येऊन दिवस व्यतीत करायला हवा, मुलांचे मनोरंजन होईल आणि थोरामोठ्यांना थोडा विरंगुळा मिळेल, असे प्रा. वानखडे यांनी सांगितले. वानखडे यांनी तब्बल ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. यानंतर त्यांनी २०१० मध्ये विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवली. खचून न जाता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. वानखडे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुळले असल्याने शेतीतून लोकांची भीती दूर करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांनी बोहरा कब्रस्तानाची शेतीसाठी निवड केली. आर्वीतील संजयनगर येथे कब्रस्तानाची सात एकर जागा आहे. येथेच त्यांनी सेंद्रिय शेती फुलवली आहे. येथे  विरंगुळ्यासाठी बगीचा तयार करून देण्याचे आश्वासन त्यांनी बोहरा समाजाला दिले आहे.

घेतात विविध पिके  कब्रस्तानाच्या सात एकर जागेपैकी एका एकरात पपई, एका एकरात मिरची, दोन एकरांत तूर, तीन एकरांत कापूस, मक्का, भेंडी, टमाटर असे विविध पीक घेत आहे. लहान मुलांसाठी बगीचा तयार केला असून खेळणी लावली आहे. तसेच विविध प्रकारच्या फुलांचे झाड लावले आहेत.

शेतीतून नफा मला कमवायचा नाही. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे मन प्रसन्न व्हावे हीच माझी इच्छा आहे. मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच अंधश्रद्धा दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. यातून दोन्ही उद्देश साध्य होत आहे. लोकांच्या मनातील भीती दूर होण्यासह निसर्गाकडे चला, सेंद्रिय शेती करा, दीर्घायुषी व्हा.  - संजय अंबादास वानखडे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT