पिककर्ज वाटप  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा  बॅंकांचा हात आखडताच असल्याची स्थिती आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरीप हंगामासाठी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत बॅंकांनी केवळ १३.१९ टक्‍केच कर्जपुरवठा केला आहे. जिल्हा सहकारी बॅंकांनी ४४ टक्‍के कर्जवाटप करून आघाडी घेतली तर व्यापारी बॅंकांनी केवळ ५.५३ टक्‍के आणि ग्रामीण बॅंकेने ९.९१ टक्‍केच कर्जवाटप केले आहे. शेवटच्या व्यक्‍तीला लाभ मिळेपर्यंत सुरू असलेली कर्जमाफीची योजना व बॅंकांची पीक कर्जवाटपासाठीची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे. याचा थेट परिणाम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पेरणीच्या नियोजनावर होत आहे. जून जवळपास संपल्यात जमा असतानाही बॅंकांनी खासकरून राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बॅंकांनी कर्जपुरवठ्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.   मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील बॅंकांना यंदाच्या खरिपासाठी ११३१८ कोटी ६६ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना २०६९ कोटी ७ लाख ६३ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना ७ हजार ६७२ कोटी ७९ लाख ९८ हजार रुपये तर ग्रामीण बॅंकांना १५७६ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये कर्जवाटपाच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. २४ जून अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना मिळालेल्या उद्दिष्टाच्या ४४.११ टक्‍के कर्जवाटप करताना २ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांना ९१२ कोटी ६४ लाख २५ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. व्यापारी बॅंकांनी केवळ ३६ हजार ८२४ सभासदांना ४२४ कोटी ४८ लाख ५६ हजार रुपयांचे कर्जवाटप करत ५.५३ टक्‍केच कर्जवाटप केले. ग्रामीण बॅंकेने १७ हजार ३४० शेतकऱ्यांना १५६ कोटी २५ लाख ९० हजार रुपये कर्जवाटप करत ९.९१ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केल्याची स्थिती आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २८.५१ टक्‍के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ४.६७ टक्‍केच खरिपासाठी कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २१.९५ टक्‍के, जालना १३.०८ टक्‍के, परभणी ६.६९ टक्‍के, उस्मानाबाद १३.५१ टक्‍के, बीड ६.५५ टक्‍के, नांदेड ५.८३ टक्‍के कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT