Crop insurance scheme for rabbis implemented in Nanded district
Crop insurance scheme for rabbis implemented in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. रब्बी ज्वारीसाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर, तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबरची  अंतिम मुदत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्या,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकियो कंपनीची नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकियो कंपनीच्या वतीने जिल्ह्यात पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. 

पीकनिहाय समाविष्ट तालुके

हरभरा : नांदेड, अर्धापूर, बिलोली, अर्धाबाद, हदगाव, देगलूर, मुखेड व किनवट (सर्व मंडळ). गहू (बागायती) : नांदेड (वजीराबाद व नांदेड ग्रामीण वगळून सर्व मंडळ), कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव व भोकर तालुके. रब्बी ज्वारी : बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व मंडळ), देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट व हदगाव तालुके.

पीक  विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता अंतिम तारीख
बागायती गहू  ३५,००० ५७०  १५ डिसेंबर
रब्बी ज्वारी २८,००० ४२० ३० नोव्हेंबर
हरभरा ३५,००० ५२५ १५ डिसेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT