Crop insurance compensation awaits victims in Nanded district
Crop insurance compensation awaits victims in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या बाबत पीकविमा कंपनीकडे तब्बल चार लाख पूर्वसूचना दाखल झाल्या. याबाबत कंपनीकडून सर्वेचे अंतिम टप्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानीनुसार भरपाईची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात जुले, आगष्ट व सप्टेंबर या महिन्यात सतत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्भवली होती. यामुळे सखल तसेच नदीकाठच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत बागायती व फळपिकांचे नुकसान झाल्यामुळे कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाकडून केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांचे सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करून शासनाला अहवाल कळविण्यात आला. 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीला पूर्वसूचना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यानुसार जिल्ह्यातून तीन लाख ९४ हजार २१५ पूर्वसूचना कंपनीकडे प्राप्त झाल्या. यात टोलफ्रीनंबर एक लाख ७७ हजार ८७४, पोर्टलवर ९१ हजार ८९२, ईमेलव्दारे दोन हजार ६०१, तर अर्जाव्दारे एक लाख २१ हजार ८४८ समावेश आहे. यातील दोन लाख तीन लाख ७८ हजार १२० पूर्वसूचनाचे सर्वे झाले आहेत. 

कंपनीकडून मंडळनिहाय नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. नदीकाठ, सखल भाग, आदी ठिकाणी नुकसान अधिक असल्याचे सर्वेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या टक्केवारीनुसार भरपाई मिळण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नुकसानीबाबत अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता असल्याचे कंपनीच्या सूत्राने सांगितले.

  कंपनीच्या कामाचा दररोज आढावा

कंपनीचे दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी नांदेडला तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. विपिन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे विमा कंपनीच्या कामाचा दररोज आढावा घेत आहेत. जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी, या साठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT