पीकविमा कंपनीच्या  विरोधात धरणे आंदोलन  Of crop insurance company Bear movement against
पीकविमा कंपनीच्या  विरोधात धरणे आंदोलन  Of crop insurance company Bear movement against 
मुख्य बातम्या

नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन 

टीम अॅग्रोवन

नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवून मुखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२) करण्यात आली. संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  इफ्को टोकियो पीकविमा कंपनीच्या पंचनामे करणाऱ्या थर्ड पार्टीच्या मुलांची पात्रता नाही. शासन नियमानुसार नुकसानीचे मूल्यांकन निश्‍चित करण्यासाठीचा अनुभव व शैक्षणिक पात्रता त्यांच्याकडे नाही. पीकविमा कंपन्यांनी निकषानुसार पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी. विमा कंपनीकडून भरती करण्यात आलेल्या अपात्र प्रतिनिधीची नियुक्ती रद्द करावी. या सोबतच मुखेड तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आल्यामुळे सरसकट पीकविम्याचा लाभ द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.  या वेळी पंचायत समिती सदस्य जे. बी. कांबळे, बालाजी वडजे, व्यकंट पाटील इंगळे, रमाकांत पाटील जाहूरकर, वैभव पाटील राजूरकर, योगेश पाटील जांभळीकर, माधव पाटील खदगावे, रामदास वाघमारे, पंढरी कांबळे, नागेश शिंदे, बालाजी राजूरवाड, नवनाथ पाटील तारदडकर, शिवाजी इंगळे, रणजित कदम, माधव घाटे, व्यंकट इंगळे, बालाजी इंगळे, राहुल देशमुख, बजरंग हिवराळे, निशिकांत हिवराळे आदी शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT