abd crop
abd crop  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात अवकाळीचा दणका 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे उशिराने काढणीस आलेल्या रब्बी पिकासह फळ पिकांचे मोठे नुकसान होते आहे. शनिवारी (ता 20) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने कांदा, ज्वारी, मका आदी पिकासह आंबा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात विहामांडवा, जायकवाडी परिसरात वादळी वारे व पाऊस झाला. लोहगाव वादळी वारा विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळल्या. आमठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. चित्तेपिपंळगाव परिसरात तुफान वादळी वारे व गारांचा पाऊस झाला. आडुळ येथे पावसाची हजेरी लागली. घाटनांद्रा परिसरात पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यात सायंकाळी साडेपाच ते सहा दरम्यान पाच ते दहा मिनिटांचा पाऊस झाला. करमाड, चित्तेपिंपळगाव, कुंभेफळ परिसरात सुमारे पाच मिनिटे बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. जुने लखमापूर (ता .गंगापूर) येथे शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागली, गहू,कांदा,हरभरा इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर ऊसतोड कामगारांच्या कोप्या गळाल्या असून अन्नधान्य संसारोपयोगी साहित्य भिजले.  जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव सह परिसरात शनिवारी ( ता.20) दुपारी चार वाजेपासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. भोगगाव ,बानेगाव ( ता. घनसावंगी) परिसरात शनिवारी चार वाजेपासून जोरदार पाऊस गारपिटीने गहु ,ज्वारी पिकांची नासाडी झाली. जवखेडा येथे जवळपास दहा मिनीट पाऊस झाला. कुंभार पिंपळगाव राजाटाकळी शिवारात वीज पडून दोन एकर ऊस जळाला. टेंभुर्णी, पिंपळगाव रेणुकाई मेघगर्जनेसह पाऊस झाला. भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह तर काही भागात तुरळक गारांचा पाऊस झाला.  2664 हेक्टरला फटका  शनिवारी (ता.20) अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जालना व परभणी जिल्ह्यातील 26 गावे बाधित झाली. जालना जिल्ह्यातील 20 गावातील 2230 हेक्टर बागायत तर 284 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील 6 गावातील 120 हेक्टर बागायत तर 30 हेक्टर फळपिकाची मिळून हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT