कर्जमुक्तीसाठी २९ हजारांवर खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण
कर्जमुक्तीसाठी २९ हजारांवर खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण 
मुख्य बातम्या

अकोला : कर्जमुक्तीसाठी २९ हजारांवर खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण

टीम अॅग्रोवन

अकोला  ः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत एक लाख ११ हजार ७९ खाती अपलोड झाली असून यांपैकी २८ हजार ७५३ खात्यांचे प्रमाणीकरणही पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी ही प्रक्रिया वेगाने पूर्णत्वास नेली जात आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ९५४ गावांपैकी ८५३ ठिकाणची यादी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ११ हजार ७९ कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या यादीत ८६ हजार ६२३ खात्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात गोरेगाव व देगाव या दोन गावांत कर्जमुक्तीची प्रायोगिक चाचणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ८५३ याद्या प्रसिद्ध झाल्या. यामध्ये ८६ हजार ६२३ खात्यांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या याद्यांमधील खातेदारांची प्रमाणीकरणाची प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत हा आकडा २८ हजारांवर पोचला आहे. कर्जमुक्तीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समित्यांच्या माध्यमातून अडचणी सोडविल्या जात आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या ८६ हजार ६२३ खातेदारांचे प्रमाणीकरण करणे हा या प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे. येथे शेतकऱ्यांची जबाबदारी संपेल. पोर्टलवरून कर्जखात्यात रक्कम वळती केली जाणार आहे.   तालुकानिहाय प्रमाणीकरण खाती अकोला ६०५५, मूर्तिजापूर ४०८१, पातूर २८५५, बाळापूर ४२५७, तेल्हारा २८८६, बार्शीटाकळी  ४३५६, अकोट ४२६३, एकूण २८७५३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT