Cotton will be procured from two and a half thousand farmers in Yavatmal district
Cotton will be procured from two and a half thousand farmers in Yavatmal district 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांकडून होणार कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशांची उपलब्धता व्हावी याकरिता कापसाची खरेदी त्वरित करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. त्याची दखल घेत आता जिल्ह्यात रोज अडीच हजार शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केली जाणार आहे.

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. शेतकऱ्यांकडून याबाबत सातत्याने वनमंत्र्यांकडे तक्रारी होत होत्या. शेतकऱ्यांच्या या समस्येची सोडवणूक होत नसल्याने मंत्री राठोड यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्‍त केली. सोबतच कापूस खरेदीचा वेग वाढविण्याचेही निर्देश दिले. याची दखल घेत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सहकार विभाग, सीसीआय, कॉटन फेडरशेनच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

तसेच जिनींग मालकांसोबतही चर्चा केली. त्यानुसार नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस पुढील दहा दिवसांत खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर वनमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे विशेष लक्ष्य राहणार आहे. सातबारा पेऱ्यावर असलेल्या कापसापेक्षा अधिक कापूस विकल्याचे निदर्शनास आल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. कापूस खरेदीकरिता नव्याने काही जिनींगला केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यातील जे जिनींग खरेदी सुरू करणार नाहीत. त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडीत करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्याबाहेरील कापूस खरेदी नाही जिल्ह्यातील जवळपास २५ हजार १४८ शेतकऱ्यांचा ७ लाख ५४ हजार ४०० क्‍विंटल कापूस खरेदी करणे बाकी आहे. स्थानिक शेतकऱ्यांना यासाठी प्राधान्य देत आंतरजिल्हा कापूस खरेदी पुढील दहा दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT