बीटी कापसाचे सरळ वाण विकसित
बीटी कापसाचे सरळ वाण विकसित 
मुख्य बातम्या

बीटी कापसाचे सरळ वाण विकसित

टीम अॅग्रोवन

नागपूर: केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसाच्या चार सरळ वाणांमध्ये क्राय-वन एसी (बीजी-१) या जनुकाचा अंतर्भाव केला आहे. महाबीज या कंपनीमार्फत हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरिता बीजोत्पादनासंदर्भाने महाबीजशी करार केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली.  केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सघन लागवडीला पूरक आणि उत्पादनक्षम वाणांना चालना देताना कपाशीचे चार बीटी सरळ वाण विकसित केले आहेत. त्यामध्ये सूरज, रजत, पीकेव्ही-०८१ आणि जीजेएचव्ही-३७४ या वाणांचा समावेश आहे. यात क्राय वन एसी या जनुकाचा वापर केला आहे. चीनसह जगातील अनेक देशांमध्ये बीटी जनुकांचा वापर सरळ वाणांमध्ये केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे विकत घ्यावे लागत नाही. परिणामी, बियाणांवरील खर्च पर्यायाने उत्पादकता खर्च कमी होतो.  संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे म्हणाले, की संबंधित बियाणे किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. क्राय-वन एसी जनुकावरील मोन्सॅटो कंपनीचे अधिकारदेखील संपुष्टात आले आहेत. त्यामुळे रॉयल्टी द्यावी लागणार नसल्याने स्वस्तात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. वाघमारे यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यातील निष्कर्षानुसार हेक्‍टरी २५ ते ३० क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे. केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा अभिमान’ या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे ९ क्‍लस्टर्स आहेत. यात गाव असलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे देण्यात आले आहे.  महाबीजशी बियाणे उत्पादन करार संबंधीत सरळ बीटी वाण बियाणे महाबीज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता रीतसर करार करण्यात आल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT