Cotton seeds available for distribution in Akola
Cotton seeds available for distribution in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात १ जूननंतरच होणार कापूस बियाणे विक्री 

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्यात कापूस बियाणे विक्रीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्णय बदलण्यात आले आहेत. मात्र, अकोला जिल्ह्यात बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच विक्री व १५ जूननंतर पेरणी करण्यासाठी प्रशासनाने विक्रेते व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. याची जिल्हाभर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

राज्यात या हंगामात बीटी बियाणे एक मे पासून उपलब्ध करून देण्याबाबत सूचना काढण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेत पुन्हा नव्याने विक्रीची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. अद्याप निश्‍चित तारीख आलेली नसली तरी अकोला जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात एक जूननंतरच बीटी बियाणे विक्री करण्याबाबत कृषी सेवा केंद्रांना सूचना केली आहे. बियाणे कंपन्यांनी २५ मे पासून ३१ मेपर्यंत पुरवठा करावा, असेही सांगण्यात आले आहे. 

अकोला जिल्ह्यामध्ये या हंगामात एक लाख ६० हजार हेक्टरवर कपाशी लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यात ७० टक्के क्षेत्र कोरडवाहू व ३० टक्के लागवड ओलिताची आहे. शासनाने हंगामासाठी जिल्ह्याला आठ लाख बियाणे पाकिटे मंजूर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून वितरकांकडे बियाणे पोचविण्यात आले आहे. 

कापसाचे मुबलक बियाणे आलेले आहे. यंदा बीटी बीजी १ बियाणे ६३५ व बीजी २ बियाणे पाकीट ७३० रुपये दराने विकण्याचे आदेश आहेत. हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर होऊ नये यासाठी बोंड अळीचे जीवनचक्र खंडीत करण्याचे नियोजन करण्यात आले. 

कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने कृषी खात्याने १ मे पासून शेतकऱ्यांना कपाशी बियाणे विक्री साठी परवानगी दिली होती. परंतु ही विक्री योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आलेले आहे. आता १५ मेपर्यंत वितरकांपर्यंत बियाणे उपलब्ध होईल. तर ३० मे पर्यंत विक्री केंद्रावर उपलब्ध करण्यात येईल. यानंतर १ जूनपासून शेतकऱ्यांना कपाशी बियाण्यांची विक्री केली जाणार आहे. 

कपाशीवरील बोंडअळीला पायबंद घालण्यासाठी पूर्व हंगामी कापूस लागवड टाळणे योग्य आहे. या उद्देशानेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ जूननंतर पेरणी करावी असे नियोजन केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक जूनपासून बियाणे मिळणार आहे. त्यापूर्वी बियाणे विक्री करू नये याचे स्पष्ट आदेश विक्रेते व कंपन्यांना दिलेले आहेत. आदेश न पाळणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.  - मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला 

बीटी बियाण्याचे यंदाचे दर 
बीजी १ कापूस बियाणे ६३५ रुपये पाकीट
बीजी २ कापूस बियाणे ७३० रुपये पाकीट
जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेते ६४० 
जिल्ह्याची मागणी ८ लाख पाकीट
संभाव्य लागवड क्षेत्र १ लाख ६० हजार हेक्टर 
विक्रीची तारीख १ जून पासून

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT