cotton seed
cotton seed  
मुख्य बातम्या

राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ 

टीम अॅग्रोवन

अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे विक्रीस सोमवार (ता.२५) पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक विक्रेत्यांनी २५ मेनंतर असा अर्थ गृहीत धरत मंगळवार (ता.२६) पासून विक्री सुरु करण्याबाबत नियोजन केल्याचे सांगितले. कृषी विभागाने आधी एक जूननंतर विक्रीची तारीख घोषित केली होती. त्यानंतर २५ मे ही तारीख जाहीर करण्यात आली. तारखेतील या गोंधळामुळेही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम बनला होता. 

राज्याच्या प्रमुख पिकांपैकी कापूस हे एक आहे. खरीपात राज्यात कापसाचे सुमारे ४२ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मागील हंगामात कपाशीची ४३ लाख ८३ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील काही वर्षात कापूस लागवड क्षेत्रात वाढ होत चालली आहे. यंदाही कपाशीचे सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक लागवडीखाली येईल, असा अंदाज गृहीत धरून कपाशी बियाण्याचे नियोजन झाले आहे. प्रामुख्याने बीटी वाणाला पसंती अधिक असल्याने त्याची पाकीटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

यंदा हंगामासाठी २५ मेपासून बीटी बियाणे विक्रीस मुभा देण्यात आली. सोमवारी अकोल्यासह विविध ठिकाणी पहिल्याच दिवशी काही कृषी केंद्रावर बियाणे विक्री सुरु झाली. ग्रामीण भागात मात्र तितकी मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसांत कपाशी बियाणे विक्रीला वेग येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. त्यामुळेही शेतकरी मोठ्या संख्येने कृषी केंद्रांकडे आलेला नाही. राज्यात कपाशीची सर्वाधिक लागवड अमरावती विभागात ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होत असते. या विभागातील अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा यासह नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर हे प्रमुख कापूस उत्पादक जिल्हे आहेत.  राज्यातील कापूस लागवड (हेक्टरमध्ये)  ११.२६ लाख  अमरावती विभाग 

६.६८ लाख  नागपूर विभाग 

५.३ लाख  लातूर विभाग 

१०.६० लाख  औरंगाबाद विभाग 

८.९७ लाख  नाशिक विभाग 

१.२६ लाख  नगर जिल्हा 

४१.९१ लाख  राज्याचे सरासरी क्षेत्र 

४३.८३ लाख  गेल्या हंगामातील लागवड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT