Cotton season in saline belt is also in trouble
Cotton season in saline belt is also in trouble 
मुख्य बातम्या

खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीत

टीम अॅग्रोवन

अकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले असून खारपाण पट्ट्यातील गावांचे प्रमुख पीक असलेल्या कापसाचा हंगामही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पाऊस उघडताच शेतशिवारात उभ्या दिसत असलेल्या कपाशीची झाडे लाल पडत आहेत. शिवाय नवीन फूल, पात्या उगवण्याचे प्रमाणही थांबले आहे. जिल्ह्यात या वर्षी १ लाख ५१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दर चांगले मिळत असल्याने खारपाण पट्ट्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी सोयाबीनला सोडचिठ्ठी देत कापसाला पसंती दिली. यामुळे सर्वत्र कापसाची लागवड दिसून येते. हंगामात लागवड झालेले पीक सुरुवातीला चांगले दिसत होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकाची वाढ होऊनही आता झाडांवर बोंडाची संख्या नगण्य आहे. शिवाय नवीन फुल, पात्या येणे थांबलेले आहे. झाडे दर दिवसाला लालसर होत आहेत. यामुळे पिकाचे उत्पादन फारसे येण्याची चिन्हे राहिलेली नाहीत. सध्या असलेले सर्व बोंड फुटत असून येत्या महिनाभरात हा हंगाम आटोपतो की, अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरवर्षी आत्तापर्यंत एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असतो. यंदा मात्र अनेकांचे मुहूर्त आता होऊ लागले.  एक किंवा दोन वेचणीमध्ये संपूर्ण कापूस निघण्याची चिन्हे आहेत. यामुळे डिसेंबरमध्ये कापूस पट्ट्यात ‘उलंगवाडी’ होण्याची शक्यताही वाढलेली आहे. काही शेतांमध्ये कपाशीचे पीक हिरवेगार दिसत असतानाच झाडांवर मात्र बोंड, पाते, फुलांची अत्यंत तोकडी आहे. आता हे पीक सुधारण्याची शक्यतासुद्धा तितकीशी दिसत नसल्याने या पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT