नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात आजपासून खरिप बियाण्यांची विक्री  
मुख्य बातम्या

नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात आजपासून खरिप बियाण्यांची विक्री

नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथील देगलूर रस्त्यावरील कापूस संशोधन केंद्रात उपलब्ध आहे. सोमवार (ता.१) सकाळी ९ वाजेपासून विक्री सुरु होईल. बियाणे विक्रीची वेळ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

टीम अॅग्रोवन

नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथील देगलूर रस्त्यावरील कापूस संशोधन केंद्रात उपलब्ध आहे. सोमवार (ता.१) सकाळी ९ वाजेपासून विक्री सुरु होईल. बियाणे विक्रीची वेळ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. 

तुरीचे बिडीएन ७११, बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६ या तीन वाणांचे, मूगाचे बीएम २००३-०२ आणि खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. तूर आणि मूग बियाण्याच्या पिशवीचे वजन ६ किलो, तर ज्वारी बियाणे पिशवीचे वजन ४ किलो आहे. तूर आणि मुगाच्या बियाणे पिशवीची किंमत ७८० रुपये, तर ज्वारी बियाणे पिशवीची किंमत २४० रुपये आहे. 

गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र वाहनाची सोय करून एका व्यक्तीस पाठवले तरी आवश्यकतेप्रमाणे बियाणे मिळेल. त्यामुळे शारीरिक अंतर राखता येईल. वाहतूक खर्च कमी करता येईल. लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करत बियाणे खरेदीसाठी या, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले. अधिक माहितीसाठी जी. बी. घोरबांड (७५८८५८१७२१) या क्रमांकावर संपर्क साधावा.  उपलब्ध वाणांची वैशिष्ट्ये 

तूर ः बीडीएन ७११ ः पांढरा रंग, कमी कालावधी (१५०-१६० दिवस ), कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त  बीडीएन ७१६ : लाल रंग, मध्यम कालावधी (१६५-१७० दिवस), संरक्षित सिंचनाकरीता उपयुक्त  बीएसएमआर ७३६ : लाल रंग, दीर्घ कालावधी (१७५-१८० दिवस),बागायतीसाठी योग्य. 

मूग ः बीएम २००३-०२ : टपोरा चमकदार दाणे असणारा भूरी रोगास प्रतिबंधक, एकाचवेळी तोडणीस येणारा वाण, कालावधी (६५-७०) 

ज्वारी ः परभणी शक्ती : लोह व जस्ताचे प्रमाण जास्त, दुहेरी उत्पादन (दाणे आणि कडबा) अधिक, बुरशीजन्य रोगास प्रतिकारक्षम असणारा वाण.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices Crash: कांदा १ रुपये किलो! शेतकरी चिंतेत; उत्पादन खर्च तर सोडा, वाहतूक खर्चही निघाला नाही

Fertilizer Price: झळा खत दरवाढीच्या!

Indigenous Seeds: गावरान तूर, वांगी वाणाची राष्ट्रीय पातळीवर नोंद

Water Conservation: रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे होतेय दरवर्षी ३२ कोटी लिटर भूजल पुनर्भरण

Sugar Export: साखर निर्यात, एमएसपीबाबत कर्नाटक सरकारकडून श्रेयवाद

SCROLL FOR NEXT