कापूस
कापूस 
मुख्य बातम्या

राज्यातील कापूस उत्पादन २० लाख गाठींनी घटणार

Chandrakant Jadhav

जळगाव ः देशात सर्वाधिक ४१ लाख ४९ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड करणाऱ्या राज्यात यंदा ७९ ते ८० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन येणार असून, मागील कपाशी हंगामाच्या तुलनेत ते २० लाख गाठींनी कमी होणार आहे. यातच महाराष्ट्राच्या तुलनेत लागवड निम्मी असतानाही गुजरातमध्येही ८० ते ८१ लाख गाठींचे उत्पादन येईल. गुजरातेत महाराष्ट्राची कपाशी अधिक प्रमाणात गेल्याने गुजरातचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनने व्यक्त केला आहे.  राज्यात १०३ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु दिवाळीनंतर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वांचे अंदाज चुकले. राज्यात गुलाबी बोंड अळीची स्थिती जेवढी गंभीर आहे तेवढी गुजरातेत यंदा नाही. तेथे सुधारित देशी व देशी कपाशी वाणांवर फारसा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नाही. २०१५ च्या हंगामात गुजरातेत गुलाबी बोंड अळी आली होती. परंतु बोंड अळीच्या नियंत्रणासंबंधी गुजरात सरकारने २१ कोटींचे विशेष पॅकेज देऊन मोहीम राबविली होती. त्यामुळे २०१६ व २०१७ च्या हंगामात गुजरातेत बोंडळी फारशी नाही. त्या तुलनेत राज्यात मात्र कोरडवाहू कपाशी अधिक आहेत. पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीने ९० टक्के रिकामे झाले आहे, दावा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अरविंद जैन यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला.  राज्याच्या उत्पादनात गुजरात हिस्सेदार राज्यात दिवाळीपूर्वी कपाशीची स्थिती बरी होती. त्याच वेळी बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार या कपाशी पट्ट्यातून गुजराती जिनर्सनी मोठ्या प्रमाणात कपाशीची आयात केली. त्यासाठी गावोगावी मध्यस्थ पाठविले होते. खेडा खरेदी वेगात केली. दरही महाराष्ट्रातील जिनर्सच्या तुलनेत क्विंटलमागे १५० ते २०० रुपये अधिक दिले. सणासुदीला पैसे लागतात म्हणून शेतकऱ्यांनीही साठविलेली कपाशी विकली. जळगाव जिल्ह्यातून तर रोज पाच हजार क्विंटल कपाशी गुजरातेत जात होती. गुजरातेत यंदा सुमारे २१ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तेथे पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र सुमारे १३ लाख हेक्‍टर आहे. देशी वाणांमुळे तेथे फरदड कपाशीही अधिक घेतली जात असल्याने उत्पादन वाढणार असल्याची माहिती मिळाली.  कपाशी १२०० तर सरकी ४०० ने वधारले मागील २८ दिवसांत दर्जेदार कपाशी कमी व किडकी कपाशी अधिक येत असल्याची स्थिती आहे. यातच दर्जेदार कपाशीचा तुटवडा वाढला असून, कपाशीचे दर मागील २८ दिवसांत एक क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयांनी वधारून ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. तर सरकीचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढले आहेत. ही तेजी पुढेही कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.  प्रतिक्रिया

महाराष्ट्रात यंदा १०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु गुलाबी बोंड अळीमुळे दर्जेदार कपाशी कमी झाली आहे. सूतगिरण्या बाहेरील राज्यातून दर्जेदार रुईचे सूत मागवून घेत आहेत. राज्यातील गाठींचे उत्पादन कमी होणार असून, ते ८३ लाख गाठींपर्यंत असेल.  - राजाराम दुल्लभ पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार)

गुजरातमधील जिनर्सनी कर चुकवून कोट्यवधींच्या कपाशीची महाराष्ट्रातून आयात केली. राज्यात सर्वाधिक कपाशी लागवड करणाऱ्या जळगावमध्ये अनेक मध्यस्थ गुजराती जिनर्सनी हाताशी धरले आहेत.  - लक्ष्मण पाटील, सचिव, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT