Cotton procurement starts at nine centers in Parbhani, Hingoli
Cotton procurement starts at nine centers in Parbhani, Hingoli 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोलीतील नऊ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यातील ९ पैकी ८ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ खरेदी केंद्रावर अशा एकूण ९ केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली, अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली.  

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, करम (ता.सोनपेठ), गंगाखेड येथील केंद्रावर सोमवारी (ता.४) कापूस खरेदीस सुरुवात झाली. परभणी येथे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके, बाजार समितीचे संजय तळणीकर, जिनिंग उद्योजक प्रेम डागा आदी उपस्थितीत होते. 

पाथरी येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस खरेदी सुरु झाली. परभणी जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर पहिल्या दिवशी एकूण २ हजार ५६० क्विंटल कापसाची खरेदी झाली. परभणी येथील केंद्रावर दररोज ५० शेतकऱ्यांचा, तर अन्य केंद्रावर हमाल कामगारांच्या कमतरतेमुळे दररोज २५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असे रेनके यांनी सांगितले. 

यापूर्वी ‘सीसीआय’च्या मानवत, जिंतूर, पूर्णा येथील केंद्रावर खरेदी सुरु झाली. मंगळवारी (ता.६) सेलू येथील केंद्र कार्यान्वित करण्यात आले. मंगळवार (ता.६) पर्यंत जिल्ह्यातील सीसीआय आणि महासंघाच्या मिळून एकूण नऊ पैकी प्रत्येकी चार अशा आठ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु झाली.  हिंगोलीतही खरेदी सुरु 

जवळा बाजार (ता.औंढानागनाथ) कृषी उत्पन्न बाजार समितींतंर्गत मार्डी येथील जिनिंग कारखान्यात सोमवारी (ता.४) ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीस सुरुवात झाली. बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मैत्रेवार, बाजार समितीचे सचिव रमेश चोखट आदी उपस्थित होते. हयातनगर येथील केंद्रावर लवकरच कापूस खरेदी सुरु होईल, असे सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT